परतीवर असतानाच सावंतवाडी शहरात पावसाची दमदार हजेरी…

2

आठवडा बाजारावर परिणाम; विक्रेत्यांसह नागरिक हैराण

 

सावंतवाडी मुसळधार कोसळणारा पाऊस गेले काही दिवस परतीच्या प्रवासावर असतानाच आज पुन्हा त्याने शहरासह नजीकच्या परिसरात दमदार हजेरी लावली.सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच भंबेरी उडवली.पाऊस कमी झाल्यामुळे शहरातील आठवडा बाजारात निश्चिंत फिरणाऱ्या नागरिकांना मात्र पावसात भिजत जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.
दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नागरिकांना पाण्याच्या चिंचेपासून सुखावून टाकले होते.मात्र अतिवृष्टीमुळे झालेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार देखील उध्वस्त झाले होते.त्यामुळे यावर्षीच्या पावसाला कंटाळलेल्या नागरिकांनी गेले चार-पाच दिवस पाऊस कमी झाल्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला होता.मात्र आज सायंकाळी पुन्हा अचानक मुसळधार पाऊस दाखल झाल्यामुळे नागरिकांचा सुद्धा पुन्हा एकदा हिरमोड झाला.तासभर पावसाचीही संततधार सुरू राहिले आहे.दरम्यान आज येथील आठवडा बाजारावर सुद्धा या पावसाचा मोठा परिणाम झाला.

8

4