Friday, December 13, 2024
Google search engine
Homeमालवणी स्पेशलसावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली लागू करा...

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली लागू करा…

मनसेच्या शिष्टमंडळाची मागणी; येत्या १० दिवसांत अंमलबजावणी करा, अन्यथा आंदोलन…

सावंतवाडी,ता.२५: तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांच्याकडे केली आहे.यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांची बैठक घेऊन त्यांना योग्य आदेश देण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान या प्रणालीची अंमलबजावणी येत्या १० दिवसांत न केल्यास आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, मिलिंद सावंत, सुधीर दळवी, राजू कासकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments