रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य; तालुक्यातील ११ शाळांना मिळणार लाभ…
सावंतवाडी,ता.२५: भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळांना उद्या सौर ऊर्जा निर्मिती संचाचे वाटप करण्यात येणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या येथील वैश्य भवन सभागृहात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संदीप गावडे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
तालुक्यातील ११ शाळांच्या वर्ग खोल्यांना सौर ऊर्जा संच देण्याचे श्री. गावडे यांनी काही महिन्यापूर्वी जाहीर केले होते. त्याला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून या उपक्रमाची वचनपूर्ती उद्या ते करणार आहेत.