Thursday, November 7, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याप्रशांत व संजय यांना समस्त आचरावासीयांनी वाहिली श्रध्दांजली...

प्रशांत व संजय यांना समस्त आचरावासीयांनी वाहिली श्रध्दांजली…

प्रशांत व संजय यांना समस्त आचरावासीयांनी वाहिली श्रध्दांजली…

आचरा, ता. २४ : आचरा समुद्रात अनंत चतुर्थी दिवशी गणपती विसर्जनावेळी झालेल्या दुर्घटनेत आचरा गावातील दोन युवक समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडले होते. सर्वांना हेलावून सोडणाऱ्या या घटनेमुळे हवालदिल झालेल्या सर्वधर्मीय आचरावासियांनी घटनेच्या बाराव्या दिवशी एकत्र येत आचरा समुद्रकिनारी त्या दोघांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. असे जीवघेणे संकट तुझ्या किनाऱ्यावर शेवटचेच ठरो अशी सागराला प्रार्थना केली.
आचरा येथील या दोन तरुणांना ज्या किनारी घटना घडली त्या किनारी मूक श्रध्दांजली वाहायची असे जयप्रकाश परुळेकर, पत्रकार परेश सावंत, उदय बापर्डेकर यांनी ठरवत व्हाट्ससप ग्रुपच्या माध्यमातून समस्त आचरावासीयांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत सर्वधर्मीय आचरावासियांबरोबर प्रशांत तावडे व संजय परब यांचे नातेवाईक तसेच चिंदर, त्रिबंक, वायंगणी गावासह मालवण, कणकवली, देवगड शहरातील ग्रामस्थ मूक श्रद्धांजली देण्यासाठी किनाऱ्यावर दाखल झाले होते.
हे सागरा ! आमच्या गावचे सुपुत्र संजय आणि प्रशांत यांना तू कवेत घेतल्यावर आज बारा दिवस झाले ! आमच्या गावावर आलेले गणेश विर्सजनाच्या वेळचे पहिलेच संकट. पुढे कोणत्या गावावर सोडाच पण कोणाचे काहीही चुकले असेल तरीही असे संकट या तुझ्या पूर्ण किनाऱ्यावर कोणावरही येऊ देवू नको म्हणून तुला हात जोडून प्रार्थना. ती मुले तुला गणपती एवढीच आवडती झाली म्हणून तुझ्या कवेत घेतलीस त्या संजय, प्रशांत या आचरे पुत्रांच्या आत्म्यास चिरंशांती लाभो अशी प्रार्थना प्रत्येक उपस्थिताने केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बंड्या खोत यांनी आचरा किनाऱ्यावरील जीवरक्षकांना लाईफ जॅकेट, गोल रिंग, दोरखंड असे बचाव साहित्य स्वखर्चातून देत भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी सतर्कता दाखवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments