रोटरी क्लबच्या वतीने उद्या बेसिक लाईफ सपोर्ट प्रात्यक्षिक…

106
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

भरड दत्तमंदिर येथे आयोजन…

मालवण, ता. २४ : मालवण रोटरी क्लबच्यावतीने स्पंदन हा बेसिक लाइफ सपोर्टचा म्हणजेच जीवन संजीवनी देण्याच्या प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम उद्या २५ सकाळी ११ वाजता दत्तमंदिर भरड येथे आयोजिण्यात आला आहे.
एखाद्या व्यक्तीचे हृदय बंद पडल्यानंतर पुढील वैद्यकीय मदत मिळेपर्यत आपण त्याच्यावर जीवन संजीवनी ही प्रक्रिया करून हृदय पूर्व स्थितीत आणण्याचा प्रयत्न करू शकतो. या प्रक्रियेचे म्हणजेच बेसिक लाइफ सपोर्टचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.

\