डॉ.चंद्रकांत पुरळकर;फोंडाघाट महाविद्यालयात पोषण अभियानास प्रारंभ…
फोंडाघाट ता.२५: वाढ आणि विकास सर्वसामान्य तऱ्हेने होण्यासाठी सुयोग्य पोषण आवश्यक असते. कुपोषणामुळे केवळ शारीरिक वाढ व विकास नव्हे त व्यक्तिच्या बौद्धिक क्षमतेही विपरीत परिणाम होताे.गरोदरपणात स्त्रीचे कुपोषण झाल्यास गर्भावर त्याचे वाईट परिणाम होतात. बालपणीच्या कुपोषणामुळे शारीरिक व मानसिक वाढ मंद होते. त्यामुळे सुयोग्य आरोग्य आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी चांगल्या पोषणाची आवश्यकता असते.असे प्रतिपादन प्रसिध्द आहारतज्ञ डाँ. चंद्रकांत पुरळकर यांनी केले. ते फोंडाघाट महाविद्यालयातील एन.एस.एस.विभागातर्फे आयोजित केलेल्या पोषण अभियान कार्यशाळेत बोलत होते.
यावेळी प्राचार्य डाँ. सतीश कामत, अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख सौ. मनस्विनी कांबळे, एन.एस.एस. विभागप्रमुख प्रा. डाँ बालाजी सुरवसे, सहाय्यक प्रा. संतोष आखाडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डाँ.कामत यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व अंगणवाडी सेविकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात प्रा. डाँ. सुरवसे यांनी पोषण अभियान राबविण्यामागचा उद्देश स्षष्ट केला. सकस अन्न न खाल्ल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल जाग्रुती निर्माण करण्यासाठी सदर कार्यशाळा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. म्हणून उत्तम वाढीसाठी, भरपूर श्रम येण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी चांगल्या व सकस अन्नाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.
प्राचार्य डाँ. सतीश कामत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कुपोषणाच्या प्रत्यक्ष परिणामापेक्षा त्याचे समाजातील अप्रत्यक्ष परिणामच जास्त धोकादायक ठरतात असे सांगितले. जास्तीचा सामान्य मृत्यू दर, जास्तीचा बालमृत्यू दर, जास्तीचा अनारोग्य दर आणि कमी झालेली आयुर्मर्यादेची संभावना हे धोके चुकीचा आहार घेतल्याने निर्माण होतात. कुपोषण वा अतिपोषाणामुळे स्थूलत्व, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तभिसरण संस्था तसेच किडनीचे आजार,कर्करोग हे आजार होऊ शकतात, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन सौ. मनस्विनी कांबळे यांनी केले. यावेळी डाँ. संतोष रायबोले, डाँ. राजाराम पाटील, प्रा. जगदीश राणे, प्रा. विनोदसिंह पाटील, डाँ. बी.वाय.डाफळे, प्रा. मयुरी सावंत, प्रा. सारिका राणे, प्रा.रूपाली माने तसेच बहुसंख्य विद्यार्थी व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी फोंडाघाट शहरातून सकस आहारासंबंधी जनजागृती फेरी काढण्यात आली.