उमेदवाराने प्रतिज्ञापत्र योग्यरीत्या न भरल्यास निर्देश पत्र रद्द होणार…?

2

सुशांत खांडेकर;सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ३०८मतदान केंद्र…

सावंतवाडी ता.२५: विधानसभा निवडणुकीत उमेदवाराने २६ नंबरचे प्रतिज्ञापत्र योग्यरीत्या न भरल्यास किंवा रिकाम्या जागा ठेवल्यास संबंधितांचे निर्देश पत्र रद्द होऊ शकते.अशी माहिती सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी आज येथे दिली.निवडणुकीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या मतदारसंघातील तीन तालुक्यात ३०८मतदान केंद्रे आहेत,आतापर्यंत २लाख २४ हजार ३७२ मतदारांची नोंदणी झाली आहे. नवीन मतदारांना नोंदणी करण्याची संधी देखील आयोगाने दिली,असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे व निवडणूक नायब तहसीलदार लता वाडकर उपस्थित होते.
सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले चे तहसीलदार सहाय्यक निवडणूक अधिकारी असतील असे श्री खांडेकर म्हणाले .सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ३०८मतदान केंद्र आहेत. यात सावंतवाडी तालुक्यात १५८ , वेंगुर्ले ९३ व दोडामार्ग ५७ मतदान केंद्रे आहेत असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संघात तालुका निहाय मतदार नोंदणीत सावंतवाडी १लाख १७हजार५५८, वेंगुर्ले तालुक्यात ६५हजार१९८, दोडामार्ग तालुक्यात ४०हजार९२३ मतदारांची नोंदणी दि.३१ ऑगस्टपर्यंत झाली आहे.अजूनही मतदाराना नाव नोंदवता येईल, नाव दुरुस्ती करता येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर म्हणाले .
या मतदारसंघात दोन लाख २४ हजार ३७२मतदारांपैकी १लाख१३हजार४३२ पुरुष व एक लाख दहा हजार ९४० मतदार आहेत . वेंगुर्ला तालुक्यात पुरुष मतदार ३३हजार१०९व महिला मतदार ३२हजार ७८२,सावंतवाडी तालुक्‍यात एक लाख१७ हजार ५५८ मतदारांपैकी ५९ हजार५८२पुरूष व ५७हजार९७६ स्त्रिया मतदार आहेत . दोडामार्ग तालुक्यात ४०हजार ९२३ पैकी २० हजार ७४१ पुरुष व २०हजार १८२हजार मतदार आहेत असे त्यांनी सांगितले .
यावेळी नवीन मतदारांना नोंदणी करण्याची संधी देण्यात आली असून त्यानंतर मतदार संख्या निश्चित होणार असल्याचे श्री खांडेकर म्हणाले मतदान नोंदणी आणि मतदार दुरुस्ती करणे बाबत देखील अवधी आहे याचा मतदारांनी फायदा घेऊन मतदान करावे असेदेखील ते म्हणाले .
या मतदारसंघात निवडणूक यंत्रणेसाठी ४फीरती पथके असून त्यात मॅजेस्टेट दर्जा असलेला एक अधिकारी, पोलिस,,व्हीडीओ ग्राफर असेल तसेच स्थिर सर्वेक्षण १०पथके व तेवढेचर ऑफिसर नेमले आहेत. मतदारसंघात ४२झोन व सेक्टर ऑफिसर नेमले आहेत.एखाद्या सेक्टर ऑफिसर कडे आठ किंवा १०केंद्रे आहेत दोडामार्ग तेरवण येथे एकच सेक्टर ऑफिसर आहे असे त्यांनी सांगून या एकही केंद्र क़िटीकल (संवेदनशील) नाही असे श्री खांडेकर म्हणाले .
या निवडणुकी संदर्भातले नोटिफीकेशन २७ सप्टेंबरला निघणार आहे . नामनिर्देशन पत्र भरण्याची सुट्टीचे दिवस वगळून शेवटची तारीख दि.४आॅक्टोबर आहे . सावंतवाडी प्रांताधिकारी कार्यालयात सकाळी११ ते ३वा.या वेळेत भरले जातील. नामनिर्देशन पत्र
भरण्यास येणाऱ्यांना उमेदवारांस पाच लोकांना केंद्रात प्रवेश दिला जाईल उमेदवारांची छाननी 5 ऑक्‍टोबरला होईल यावेळी चार लोकांना उमेदवारांसह प्रवेश दिला जाईल असे ते म्हणाले .
उमेदवारी मागे घेतल्याचे तारीखे दिवशी चिन्ह वाटप होईल असे त्यांनी सांगितले. मतदान २१ ऑक्टोबरला असून मतमोजणी दि.२४ऑक्टोबरला आहे सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात मतमोजणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले ,उमेदवारांनी 26 नंबरचे प्रतिज्ञापत्र भरायला पाहिजे निरंक कॉलम ठेवून चालणार नाही तसे झाल्यास नामनिर्देशन पत्र रद्द होऊ शकते ते म्हणाले .उमेदवारांना २८ लाख रुपयांची खर्च मर्यादा आहे.अनामत म्हणून रक्कम १०हजार तर एसीएसटी या उमेदवारांना ५हजार ठेवण्यात आली आहे.उमेदवारी दाखल करण्याच्या पुर्वसंध्येला बँक खाते द्यायला हवे व निवडणूक खर्च या स्वतंत्र बँक खात्यात करायला हवा असे ते म्हणाले.
नामनिर्देशन पत्र दाखल करताना निवडणूक प्रतिनिधी नेमावयाच्या आहे, जरूर तर निवडणूक खर्च अलाहिदा प्रतिनिधी नेमण्याची संधी मिळाली आहे असे ते म्हणाले. प्रचार साहित्य आयोगाच्या मार्गदर्शनानुसार छपाई व्हायला हवे निवडणुकी साठी लागणाऱ्या परवानग्या सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात एक खिडकी योजनेच्या माध्यमातून दिल्या जातील असे त्यांनी सांगताना निकाल लागल्यानंतर मिरवणुकी पर्यंतचा खर्च आहे तो किमान निकालानंतर ३० प्रतिज्ञापत्र सह देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.निवडणुक काळातील खर्च दैनंदिन द्यावा लागतो असे ते म्हणाले.निवडणुक कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात प्रशिक्षण दिले जाईल यामध्ये ईव्हीएम मशीन व्हीपीपीटी प्रात्यक्षिक दाखवले जाईल असे त्यांनी सांगितले.
या मतदारसंघात ९९१ दिव्यांग मतदार आहेत अस्थिव्यंग मतदारांना मतदान केंद्रावर आणणेसाठी वाहने व स्वयंसेवक का मार्फत प्रयत्न केला जातो असे ते म्हणाले. निवडणुकीच्या ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानाचे योग्य ते कागद भरून नोंदणी केली जाते असे त्यांनी सांगितले सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार राजाराम म्हात्रे, वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे व दोडामार्ग तहसीलदार मोरेश्वर हाडके यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे खांडेकर म्हणाले .

1

4