महादेवाचे केरवडेत आमदार नाईकांचा स्वाभिमानला धक्का…

140
2
Google search engine
Google search engine
Google search engine

उपसरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

कुडाळ ता.२५:

आमदार वैभव नाईक :यांच्या उपस्थितीत कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघातून विरोधी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षात घेण्याचा सपाटाच लावला आहे.बुधवारी कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे ग्रा.पं.चे उपसरपंच तुषार परब यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.आ.नाईक यांनी या सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांच्या हाती शिवबंधन बांधले.
महादेवाचे केरवडे येथे हा पक्षप्रवेशा कार्यक्रम बुधवारी पार पडला. शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, सभापती राजन जाधव, उपसभापती सौ.श्रेया परब, जि.प.सदस्य राजू कविटकर, महिला आघाडी तालुका संघटक सौ.मथुरा राऊळ, विभाग प्रमुख बबन बोभाटे, रामा धुरी, कृष्णा धुरी, सुधीर राऊळ, युवासेनेचे योगेश धुरी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपसरपंच तुषार परब यांच्यासह प्रभाकर डिचोलकर, गंगाराम डिचोलकर, प्रसाद डिचोलकर, अजिंक्य मार्गी, सागर डिचोलकर, प्रमोद डिचोलकर, बाळकृष्ण मार्गी, राजेश मार्गी तसेच मालाचीराई येथील असंख्य ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून भगवा झेंडा हाती घेतला. शिवसेनेच्या माध्यमातून व खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना. दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मोठ्या प्रमाणात विकासकामे तसेच जनतेचे प्रश्न मार्गी लागले आहेत. आमदार वैभव नाईक यांनी या भागातील अनेक प्रश्न सोडविले आहेत. आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच शिवसेनेच्या माध्यमातूनच या भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो हे जाणून आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांना या भागातून मोठे मताधिक्य मिळवून देणार असल्याचा निर्धार यावेळी प्रवेशकर्त्यांनी केला. आमदार वैभव नाईक यांनीही माणगांव खोरे हा शिवसेनेचा बालेकील्ला असून या भागातील जनतेने आतापर्यंत शिवसेनेला चांगली साथ दिली आहे असे सांगत यापुढेही या भागातील जनता अधिक भक्कम साथ देईल असा विश्वास व्यक्त केला.

\