राणेंचे कट्टर समर्थक संजू परब “मुंबई वारीवर”…

2

कार्यकर्त्यांत कुजबूज; त्यांच्या पुढील भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष…

सावंतवाडी ता.२५:

गेले काही दिवस महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून सावंतवाडी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले तालुकाध्यक्ष संजू परब आज अचानक मुंबईवारीसाठी गेल्याचे समजते.ते नेमके कुठे गेले,कोणाच्या संपर्कात आहेत,हे मात्र कळू शकले नाही.गेले काही दिवस श्री परब हे आपल्या पक्षात शांत आहे.शिवसेनेच्या नेत्यांकडून त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी ऑफर आहे.त्यामुळे नेमकी त्यांची भूमिका काय आहे? ते कोणाला भेटण्यासाठी गेले ? हे आता प्रश्नचिन्ह आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शिवसेनेचे नेते पालकमंत्री दीपक केसरकर व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे भेटले होते.यात त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याची चर्चा होती.दरम्यान श्री.परब हे कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जातात.ते माजी खासदार निलेश राणे यांना मानणारे कार्यकर्ते आहेत.काही झाले तरी आपण राणेंना व पर्यायाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सोडणार नाही,असं त्यांनी वारंवार सांगितले आहे.त्यामुळे त्यांची नेमकी मुंबईवारी कशासाठी हे मात्र प्रश्नचिन्ह आहे.

3

4