दारू वाहतूक केल्याप्रकरणी कारीवडेतील एकाला अटक….

2

एक लाखाचा मुद्देमाल जप्त: सावंतवाडी पोलिसांची कारवाई…

सावंतवाडी ता.२५:

गोवा बनावटीच्या अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या भरारी पथकाने एकाला ताब्यात घेत तब्बल १ लाख १ हजार ७७० रुपयाचा एकूण मुद्देमाल ताब्यात घेतला.ही कारवाई दुपारी साडेतीनच्या सुमारास माजगाव गोठवेश्वर मंदिर येथे करण्यात आली.
अजित बाळकृष्ण मटकर वय ३३ रा. कारिवडे भोगटे नगर असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव असून तो आपल्या ताब्यातील कारमधून गोवा ते सावंतवाडी अशी गोवा बनावटीची दारूची वाहतूक करत होता.याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या भरारी पथकाला मिळताच त्यांनी बांदा-सावंतवाडी रोड वर माजगाव गोटेवेश्वर मंदिर येथे सापळा रचला दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी मटकर यांच्या ताब्यातील कार तपासणीसाठी थांबवली असता त्यामध्ये ३१ हजार रुपयाची गोवा बनावटीची दारू असल्याचे दिसून आली सदरची दारू व कार मिळून सुमारे एक लाख एक हजार 170 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत मटकर याच्यावर कारवाई केली.
याबाबत येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

0

4