निळेली मधील स्वाभिमान कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश …..

2

आमदार वैभव नाईक .:यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…

कुडाळ ता. २५ :

माणगाव खोऱ्यातील निळेलेतील स्वाभिमानीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज लक्ष्मण कोठावळे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. स्वाभिमान ची महिला कार्यकर्ता रसिका कदम यांच्या उपस्थितीत निळेलीतील तमाम कार्यकर्ते महिला व पुरुष कार्यकर्ते यांनी प्रवेश केला तसेच रसिका कदम यांनी आपले मनोगत आजच्या घडीला गावचा आणि वाडीचा विकास करायचा असेल तर मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपला विकास वाडीचा गावचा पूर्ण करतील असा विश्वास ठेवून आम्ही प्रवेश करत आहोत. गावचे कार्यकर्ते श्रीकृष्ण भितये ,भूषण भितये,राजेश डीगे, गुंडू भितये, पात्रीस डिसोजा, मालव , गौरेश परब ,भाऊ धुमक ,स्नेहल भितये, राजेश डीगे, मोहन डीगे, दीपक डीगे ,विजय भितये, राजू भीतये, दिलीप गोडे, रसिका भीतये,दीप्ती कोठावळे, आदींनी आधी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी प्रवेश केला.
यावेळी कुडाळ पंचायत समिती सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, जि प सदस्य राजू कविटकर ,माणगाव पं स सदस्य मथुरा राऊळ, युवा सेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी, शाखाप्रमुख संतोष बांदेकर , गंगासागर धुमक ,कृष्णा धुरी ,रामा धुरी, विष्णू तांमणेकर ,शंकर नाईक भाई घाडी ,बाळू कोठावळे ,आदी तमान शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

0

4