संजय आरके नवे माहिती अधिकारी…

93
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रभारी पदभार ; बांदिवडेकर यांच्या निवृत्तीनंतर पद होते रिक्त…

सिंधुदुर्गनगरी, ता. २५ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून संजय डी. ओरके यांची नियुक्ती झाली आहे. तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर शासनाने निवडणुकीपूर्वी त्यांना या जिल्ह्याच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.
बुधवारी संजय ओरके यांची मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे यांच्यासमवेत मुख्यालय पत्रकारांनी सदिच्छा भेट घेतली. आतापर्यंत त्यानी मंत्रालय, मुंबई येथे माहिती विभागात काम केले आहे. जिल्ह्यातील पत्रकार व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आदी सर्वांनीच आपले या जिल्ह्यात चांगले स्वागत केले असून या सर्वांबद्दल त्यांनी पत्रकारांशी बोलताना गौरोद्गार काढले. जिल्ह्यातील प्रिन्ट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, पत्रकार संघ, साप्ताहिक संघ आदी विषयाची माहिती घेतली. या जिल्ह्यात सुरू असलेल्या बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनाच्या कामाची माहिती ही जाणून घेतली.
संजय ओरके यांचे मूळगाव विदर्भातील वर्धा हे असून त्यांच्या नियुक्तीपासून त्यांनी मंत्रालय, अधिपरिक्षक, पुस्तके व प्रकाशने, महान्यूज आदी कक्षामध्ये सेवा केली आहे. गेले अडीच वर्षे त्यांच्याकडे कोल्हापूर विभागातील सहायक संचालक म्हणून पदभार आहे.

\