सिताराम गावडे:सावंतवाडी मराठा समाजाकडुन निषेध….
सावंतवाडी ता.२६:
शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारण व समाज कारणामधील एक जेष्ठ नेतृत्व आहे.शिवाय मराठा समाजाचे ते आधारवड आहेत.अशा पितृतुल्य नेतृत्वाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर ईडीची भीती दाखवून एक मराठा नेतृत्व संपविण्याचा घाट भाजप प्रणित शासन घालीत आहे.त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करीत आहे.असे सावंतवाडी मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
शासनाला ऐन निवडणुकीच्या तोंडावरच ईडी ची आठवण का झाली.महाराष्ट्रातील मराठा नेतृत्व संपविण्याचा हा घाट तर नव्हे ना? आज पर्यंत मराठी मोडले पण वाकले नाहीत.हा इतिहास शरद पवार यांनी जागृत केला आहे दिल्लीच्या तक्ता समोर आपण झुकणार नाही जे काय होईल त्याला सामोरे जाईल असे स्पष्ट केले आहे .शरद पवार यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीने केल्याचे दिसून येते त्यामुळे अशा हिटलरशाही पद्धतीने वागणार वागणाऱ्या शासनाचा मी निषेध करीत आहे.असेही श्री.गावडे यांनी म्हटले आहे.