आंबोली-चौकुळ मधील बंद घरांचा वापर पर्यटनासाठी करणार…

2

ग्रामस्थांचा पुढाकार; निवास व न्याहारी उपक्रम राबविण्याचा निर्णय…

सावंतवाडी ता.२६: आंबोली-चौकुळ येथील बंद घरांचा वापर निवास व न्याहरी योजनेसाठी करुन पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावेत,असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष बापु गावडे यांनी आज येथे आयोजित बैठकीत केले.त्यासाठी चौकुळ कबुलायतदार गावकर ग्रामीण कृषी पर्यटन विकास सहकारी संस्था आपल्या सदैव पाठीशी राहील असेही आश्वासन यावेळी बोलताना त्यांनी दिले.
यावेळी संस्थेचे संचालक पांडुरंग गावडे,अरुण गावडे,तुकाराम गावडे,सुरेश गावडे, लक्ष्मी गावडे सचिव गुलाबराव गावडे व सभासद उपस्थित होते. यावेळी सभासद सत्यवान गावडे खासकिलवाडी, भगवान परब केगदवाडी,विनोद गावडे पाटीलवाडी यांनी नविन निवास न्याहारी (Home stay)सुरु केल्याबद्दल तसेच कुंभवडेचे मधुकर गावडे यांनी कुपेकर (बाबा)धबधबा चालवायला घेतल्या बद्दल तसेच अच्युत गावडे आपल्या नेनेवाडी येथील शेतात कृषी पर्यटन प्रकल्प उभारत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

5

4