वेंगुर्ले.ता.२६: जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. हापूस सभागृह, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे आधार फाऊंडेशन, महाराष्ट्र सरपंच सेवा संघ-शाखा वेंगुर्ला व आम्ही वेंगुर्लावासीय या संस्थांमार्फत ‘पर्यटन परिसंवादा‘चे आयोजन केले आहे.
विविध शासकीय विभागाचे अधिकारी पर्यटनातील सुसंधी, अडीअडचणी व उपाययोजना यावर मार्गदर्शन करणार आहेत. यात प्रामुख्याने ग्रामपंचायत विभाग, जिल्हापरिषद सिधुदुर्ग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक बंदर अधिकारी, कस्टम विभाग, वनविभाग, अन्न व औषध प्रशासन, वस्तू व सेवाकर विभाग, राज्य उत्पादक शुल्क, महसूल विभाग सिधुदुर्ग, सीआरझेड तज्ज्ञ मार्गदर्शक, तालुका कृषी विभाग, पोलिस प्रशासन, पंचायत समिती, तहसिल कार्यालय, विज विभाग आदी विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी पर्यटन व्यावसायीकांना पर्यटन धोरण, विविध आवश्यक परवानग्या, सीआरझेड सुधारीत नियमावली, वन्य जीव पर्यटन, ग्रामीण पर्यटन, किल्ले पर्यटन, सागरी स्पोर्टस, साहसी खेळ व इतर महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून नवीन पर्यटन उद्योजकांसह सर्वांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.