एमटीडीसीच्या नाकर्तेपणामुळे सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा कागदावरच

2

डी.के सावंताचा आरोप:”डेक्कन ओडिसी” पांढरा हत्ती ठरल्याचे म्हणणे

सावंतवाडी ता.२६: केवळ एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी आडमुठे पणाचे धोरण राबविल्यामुळे बावीस वर्षांपूर्वी पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आलेला सिंधुदुर्ग जिल्हा आजही पर्यटनदृष्ट्या मागे राहिला आहे.अनेक पर्यटन विकास फक्त कागदावरच राहिले आहेत.करोडो रूपये खर्चुन आणलेली डेक्कन ओडिसी पांढरा हत्ती ठरल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते तथा द्वारका कृष्ण पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष डि.के.सावंत यांनी आज येथे केला.जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास होण्यासाठी येथील निसर्ग, प्रसिद्ध मंदिरे, समुद्र किनारे, वेगवेगळे सण,संस्कृती, स्कुबा- डायव्हींग
व स्नॉर्केलिंग सारखे देश-परदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे साहसी क्रिडा प्रकार तसेच ग्रामीण व कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन विकास शक्य असताना त्याकडे हेतू पुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे.पर्यटनासाठी आलेल्या निधीत भ्रष्टाचार, हाऊस बोट,तरंगते धक्के, वेगवेगळ्या पर्यटन स्थळी न चालणारी हाॅटेल, पार्कींग असे अनेक प्रकल्प, देश परदेशातील पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून दलालांना हाताशी पकडून कोट्यावधी रुपयांचा निधी हडप केला जातो.याकडे लक्ष न देण्याची शासनाची भूमिका. यामुळे योग्य त्या कारणासाठी निधी खर्च केला जात नाही.
गेल्या पंधरा वर्षांपासूनची पर्यटन व्यावसायिकांची सभा घ्यावी ही मागणी आम्ही सातत्याने करुन सुद्धा आपला भ्रष्टाचार चव्हाट्यावर येईल म्हणून जिल्हाधिकारी यांची नेहमीच दिशाभूल करण्यात MTDC चे स्थानिक अधिकारी यशस्वी ठरले यात शंका नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जो काही पर्यटन विकास दिसत आहे. तो स्थानिक पर्यटन व्यावसायिकांची मेहनत व कौशल्य यामुळे आहे यात MTDC चा कसलाही वाटा नाही.मोठमोठ्या जाहिराती प्रसिद्ध करून डेक्कन ओडिसी सारखा पांढरा हत्ती पोसण्यापेक्षा स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना हाताशी धरून, त्यांच्याशी विचार विनिमय करून उपलब्ध साधनांच्या आधारे पर्यटन विकास केला असता तर आज जिल्ह्याचे चित्र निस्चितच वेगळे दीसले असते.

0

4