Wednesday, July 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यागवा रेड्याच्या हल्ल्यात जखमी शेडगेंना नितेश राणेंचा मदतीचा हात..

गवा रेड्याच्या हल्ल्यात जखमी शेडगेंना नितेश राणेंचा मदतीचा हात..

कुडाळ.ता,२६: गवा रेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या
माणगावउपवडे (देऊळवाडी) येथील सुभाष शेडगे (वय 60 ) यांना आमदार नितेश राणे यांनी मदतीचा हात दिला.
त्यांच्यावर पंधरा ते वीस दिवसांपूर्वी गव्याने हल्ला केला होता.यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर गोवा बांबुळी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत ही बातमी ब्रेकिंग मालवणीने लावून धरली होती.
तसेच खासदार नारायण राणे मागील आठवड्यामध्ये माणगाव खोऱ्यामध्ये दौऱ्यावर असताना माणगाव ग्रामपंचायत सदस्य श्री दत्ता कोरगावकर यांनी पुढाकार घेऊन खासदार राणे साहेब यांच्या ही बाब कानावर घातली. त्यांची घरची परिस्थिती बिकट असल्याने आर्थिक मदतीचा हात मिळावा यासाठी प्रयत्न केला होता.आता राणे यांनी आर्थिक मदतीची हात दिली. माणगाव खोऱ्यातील गरीब कुटुंबाला आधार देण्यासाठी कुडाळ चे स्वाभिमान तालुका अध्यक्ष विनायक राणे व माणगाव ग्रामपंचायत सदस्य दत्ता कोरगावकर यांनी प्रयत्न करून मदत मिळवून दिली .याची सर्व माणगाव खोऱ्यातील जनतेतून आभार मानण्यात येत आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments