रस्ते दुरुस्तीच्या यादीला, वित्त समितीचा आक्षेप

2

अधिकाऱ्यांवर मनमानीचा आरोप:
पुन्हा यादी करून मंजूरी घेण्याच्या सूचना

सिंधुदुर्गनगरी.ता,२६:
जिल्हा नियोजनमधून २०१९-२० साठी सर्वसाधारण योजनेतून दोन कोटी ४४ लाख ७६ हजार रुपये खर्चाची बनविलेली यादी अधिकाऱ्यांनी मनमानी करीत बनविली आहे. कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी प्रत्येक्ष ग्रामीण भागात न फिरता या याद्या बनविल्या आहेत. याची माहिती सुद्धा बांधकाम सभापती यांना दिलेली नाही. त्यामुळे वाहतुकीस अयोग्य रस्ते या यादीत आलेले नाहीत. ही मनमानी आम्ही खपवून घेणार नाही. ही यादी रद्द करून पुन्हा यादी बनवत जिल्हाधिकारी यांची मंजूरी घ्यावी, असे आदेश गुरुवारी झालेल्या वित्त समिती सभेत देण्यात आले. यावेळी रस्ते दुरुस्तीच्या यादिचा विषय आला असता रविंद्र जठार यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना टार्गेट केले. यावेळी रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी १४ लाख रूपये खर्च केल्याचे सांगण्यात आले.
जिप वित्त समितीची सभा येथील बॅ नाथ पै समिती सभागृहात सभापती जेरोन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिप मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, समिती सदस्य संतोष साटविलकर, रविंद्र जठार, महेंद्र चव्हाण, संजय देसाई, अधिकारी खातेप्रमुख आदि उपस्थित होते.
सिंधुदुर्गनगरीमधील रस्ते नादुरुस्त झाले आहेत. याबाबत मागील सभेत सदस्यांनी आवाज उठविला होता. आजच्या सभेत याबाबत यावर पुन्हा चर्चा झाली. यात सिंधुदुर्गनगरी नवनगरविकास प्राधिकरण येथील रस्त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच येथील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याकडे प्राधिकरण लक्ष देत नसून मनमानी कारभार करीत असल्याने सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच अनावश्यक ठिकाणी खर्च करणाऱ्या प्राधिकरणने रस्ते दुरुस्त करता येत नसतील तर त्यांनी तस जाहिर करावे. असे आवाहनही समिती सभेत सर्व सदस्यांनी दिले.
जिप च्या एकूण बजेट २१ कोटी स्व उत्पन्नपैकी आतापर्यंत २ कोटी २१ लाख एवढाच खर्च झाला आहे त्याची टक्केवारी १० टक्के एवढीच आहे. हस्तांतरण योजना ३७६ कोटी पैकी २९८ कोटी खर्च, अभिकरण योजना २० कोटी १० लाख पैकी १२ कोटी ६० लाख खर्च, दुरुस्ती देखभाल ६ कोटी ८५ लाख पैकी ७७ लाख खर्च, खासदार निधी १ कोटी ३४ लाख पैकी ९५ लाख खर्च, राष्ट्रिय पेयजल १० कोटी ६९ लाख पैकी १ कोटी ३७ लाख रूपये एवढे खर्च झाले असल्याची माहिती सभेत दिली.

1

4