जिल्हा परिषद आवारातील फळ झाडांना मालकच नाही बांधकाम समिती सभेत झाले उघड

2

बांधकाम व कृषि विभागाचे कानावर हात

सिंधुदुर्गनगरी.ता,२६:
जिल्हा परिषद इमारत आवारात असलेली फळ झाडे उत्पादन देणारी झाली तरी त्याची देखभाल कोणी करायची हे निश्चित न झाल्याने गुरुवारी बांधकाम समिती सभेत जोरदार हंगामा झाला. बांधकाम व कृषि विभागांनी यावेळी कानावर हात ठेवले. त्यावर ही जबाबदारी कृषि विभागाचीच असल्याचे सभागृहाने सांगत याबाबत धोरण ठरविण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली बॅ नाथ पै सभागृहात संपन्न झालेल्या बांधकाम समिती सभेला उपअभियंता पी एस पाटील, सदस्य रविंद्र जठार, राजेश कविटकर, प्रदीप नारकर, मनस्वी घारे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने प्राधिकरण क्षेत्रात असलेला राखीव 49 नंबरचा भूखंड हा अभियांत्रिकी यासाठी राखीव होता. तो आता विश्राम गृह उभारणीसाठी घेण्याचे निश्चित करण्यात आले. तशी मागणी तलाठी यांच्या जवळ लेखी करण्यात आली आहे. यावेळी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र व नडगिवे प्राथमिक शाळेचा विषय पुन्हा गाजला. नडगिवे शाळा 24 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण न झाल्यास 26 ऑक्टोबर रोजी या शाळेतील मुलांना बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या दालनात बसविणार असल्याचे यावेळी रविंद्र जठार यांनी सांगितले. तसेच वैभववाडी प्रशासकीय इमारतीचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. इमारतीची छप्पर गळती होत असल्याने या इमारतीचे सुधारित 2 कोटी 99 लाख रुपयांचे अंदाजपत्रक शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

3

4