मानव विकास एस. टी. बसच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

2

वैभववाडी,ता.२६ : मानव विकास एस.टी. गाड्यांच्या अनियमित वेळेमुळे सडुरे, शिराळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वैभववाडी – शिराळे या एस.टी. गाडीच्या फेऱ्यांमधील वेळेत बदल करण्यात यावा. या मागणीचे निवेदन विकास विद्यालय सडुरे – अरुळे प्रशालेच्या वतीने आगार व्यवस्थापक कणकवली यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
सायंकाळी सव्वापाच वाजता सुटणारी वैभववाडी – शिराळे ही एस.टी. रात्री उशिरा वैभववाडीतून सुटते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंधारातून चाचपडत प्रवास करावा लागतो. या पायी प्रवासात विद्यार्थ्यांना जंगली प्राण्यापासून धोका उदभवू शकतो. सदर गाडी ही वैभववाडी बसस्थानकातून सायंकाळी ५ वा. सोडावी. तसेच सकाळी ९.१५ वा. सुटणारी वैभववाडी – शिराळे ही गाडी ८.३० वा. सोडण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून मुख्याध्यापक पी. एन. साळुंखे यांनी केली आहे.

9

4