राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सुडबुद्धीचे राजकारण

2

वैभववाडी राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने तीव्र निषेध

वैभववाडी.ता,२६: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केंद्र व राज्य सरकारने सुडबुध्दीचे राजकारण करुन त्यांच्यावर ईडी मार्फत खोटा गुन्हा नोंद केला आहे.सरकारच्या या सुडबुध्दीच्या राजकारणाचा आम्ही तीव्र निषेध करतो.असे निवेदन राष्ट्रवादी काॕग्रेस वैभववाडी तालुक्याच्यावतीने तहसिलदारांना देण्यात आले आहे.
सहकार, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात जागतिक पातळीवरील नेते आहेत.आगामी विधान सभा निवडणूकीत युती सरकारच्या मार्गातील शरद पवार हे मोठा अडथळा ठरत आहेत.राज्यात सुरु असलेल्या त्यांच्या झंझावाती दौऱ्याला जनतेतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.यामुळे राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.भाजपच्या नेत्यांना त्यांची भित्ती वाटत आहे.
मुंबई दौऱ्यावर आलेल्या भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या टीकेला उत्तर देतांना पवार यांनी मी खूप काही बरे वाईट केले, पण माझ्यावर कधीही तरुंगात जाण्याची वेळ आली नाही.अमित शहा तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत.अशी टीका केल्यामुळे ईडीमार्फत पवारांवर गुन्हा नोंद केला आहे.अंमलबजावणी संचालनालय हे केंद्र व राज्य सरकारचे बटीक असल्या सारखे वागत आहे.पवारांवर गुन्हा नोंद करुन देशातील जनतेला भाजपने दाखवून दिले आहे, की आमच्या नेत्यांच्या किंवा सरकारच्या विरोधात तुम्ही बोललात तर आमच्याकडे ईडी आहे.माञ ईडीला पवार घाबरणार नाहीत. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या सुडबुध्दीच्या राजकारणाचा वैभववाडी राष्ट्रवादी काॕग्रेस जाहीर निषेध करीत आहोत.असे निवेदन तहसिलदार यांना दिले आहे.यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सदाशिव मुरकर, महेंद्र रावराणे, अरुण सरवणकर, संकेत सावंत, विश्वजीत चव्हाण, अशोक शिंदे, ज्ञानदेव पवार, वसंत चव्हाण, भिकाजी लसणे, प्रभाकर तावडे आदी.पदाधिकारी उपस्थित होते.

2

4