वेंगुर्लेतील सातेरी मंदिरात २९ पासून नवरात्रोत्सव….

2

वेंगुर्ले : ता.२६
वेंगुर्ले येथील ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात रविवार दि. २९ सप्टेंबर ते सोमवार दि.७ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रौत्सव साजरा होणार आहे.
यानिमित्त दि. २९ रोजी सकाळी ९ वा. घटस्थापना व उत्सवाला सुरुवात, दि. २९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर पर्यंत सायंकाळी ५ ते रात्रौ ११ वाजेपर्यंत संगीत व वारकरी भजने, रविवार दि.६ रोजी रात्रौ ११ वाजता दिडी प्रदक्षिणा, महाआरती व तिर्थप्रसाद. सोमवार दि.७ रोजी  नवचंडी, होमहवन व पूर्णाहुतीने उत्सवाची सांगता. दररोज मंदिरात देवीच्या नऊ रुपांचे दर्शन, पुष्पपुजा असे कार्यक्रम होणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे केले आहे.

2

4