वैभववाडी तालुक्यात मतदान जनजागृती फेरी….

2

वैभववाडी, ता.२६ 

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात मतदान जनजागृती कार्यक्रम सुरु आहे. गावोगावी मतदान केंद्रावर जाऊन मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करणे, मतदानाची टक्केवारी वाढविणे, दिव्यांग व वृध्द मतदार मतदानापासून वंचित राहाणार नाही. यासाठी प्रत्येक मतदारास जागृत करणे. एकूणच मतदानाची टक्केवारी ७५ टक्के पर्यंत वाढविणे.याबाबत लोकांमध्ये प्रबोधन करण्यात आले.
आतापर्यंत वाभवे, खांबाळे मोहितेवाडी, कोळपे, दिगशी, तिथवली, नानीवडे, नाधवडे, आर्चिर्णे, लोरे, जांभवडे, तिरवडे तर्फ सौंदळ, नेर्ले, वेंगसर, कुंभवडे, करुळ, जामदारवाडी, एडगाव, सांगुळवाडी, नावळे व निमअरुळे या गावातील २८ मतदान केंद्रावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
तसेच स्वीप कार्यक्रमांतर्गत माधवराव पवार विदयालय कोकिसरे येथे जनजागृती प्रभात फेरी, निबंध स्पर्धा घेण्यात आली. तर आचिर्णे येथे विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. दि.२६ सप्टेंबर पासून महाविदयालयांमध्ये निबंध स्पर्धा, चिञकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, जनजागृती रॕली असे उपक्रम घेण्यात येणार आहेत. अशी माहिती तहसिलदार रामदास झळके यांनी प्रसिद्धीपञकाद्वारे दिली आहे.

2

4