खाकीतील माणूस की दाखवणाऱ्या प्रमोद काळसेकरांचा सत्कार ….

2

पोलिस अधिक्षकांकडुन गौरव:हुमरस येथील अपघातातील जखमींना केलेली मदत….

सावंतवाडी,ता.२६:
आपली ड्युटी संपवून घरी जात असताना वाटेत झालेल्या अपघातात जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना मदत करून “खाकीतील माणुसकी” दाखवणाऱ्या सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रमोद काळसेकर यांच्या पाठीवर खुद्द पोलीस अधीक्षकांनी कौतुकाची थाप मारली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे.
यावेळी पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे व सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे आदी उपस्थित होते.

3

4