नितेश नाईक यांना सशर्त जामीन….

2

व्यापारी अपहरण व लूटमार प्रकरण….

सिंधुदुर्गनगरी,ता.२६:

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील व्यापा-याचे अपहरण करत त्याला मारझोड करून दागिने व रोख रक्कमेसह 5 लाख 56 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नितेश नंदकुमार नाईक याला येथील जिल्हा न्यायाधीश २ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी ३० हजार रुपयांचा सशर्त जामिन मंजूर केला आहे.
नाईक याच्यावतीने वकील संग्राम देसाई, सुहास साटम आणि अष्पाक शेख यांनी काम पाले.

१३ मे रोजी हातकणंगले येथील व्यापारी उमेश वसंतराव पिसे हे गोवा येथून आपल्या घरी इर्टीगा कारने जात होते. आंबोली-बेळगाव मार्गावर सहा आरोपींनी स्कॉर्पिओ वाहनाने पिसे यांच्या कारचा पाठलाग करून त्यांची कार अडवली व अपहरण केले. पिसे यांना पिस्तुल दाखवून मारझोड केली. अंगावरील दागिने तसेच रोख रक्कम १ लाख ९० हजार रुपये असा एकूण ५ लाख ५६ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास करत या व्यापा-याला बेळगाव येथे टाकून दरोडेखोर पळून गेले होते. त्यानंतर व्यापारी पिसे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्वप्निल बाळासो गजबर (३२, इचलकरंजी), सुरज नझिर मेहतर (३३, म्हापसा, मुळ रा. सावंतवाडी), उत्तम विष्णू कामटे (३३, निपानी), संगमेश बंडू जाधव (३०,निपानी, विजय विलास भोई (३०, मुरगुड जिल्हा कोल्हापूर) व नितेश नदकुमार नाईक (२९) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनंतर न्यायालयाने या संशयीतांना प्रथम पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सध्या हे सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्याने या पैकी नितेश नंदकुमार नाईक याने आपल्याला जामिन मिळावा यासाठी विनंती अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने सशर्त मंजूर केला आहे.

2

4