नारुर श्री.देवी महालक्ष्मी मंदिरामध्ये २९ सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवानिमित्त महालक्ष्मीचा वार्षिक जत्रोत्सव….

2

कुडाळ, ता.२६:

नारूर येथे श्री देवी महालक्ष्मी मंदिरामध्ये २९ सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवानिमित्त श्री देवी महालक्ष्मी चा वार्षिक जत्रोत्सव होणार आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री देवी महालक्ष्मी देवस्थान कमिटी नारूर, गावकर मंडळी व नारूर ग्रामस्थांनी केले आहे.
नारूर येथे श्री देवी महालक्ष्मी मंदिरामध्ये होणारे कार्यक्रम पुढील प्रमाणे रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. घटस्थापना, रात्रौ ७.३० वा. कीर्तन,यजमान श्री राजेंद्र नारकर कुटुंबीय,सोमवार.दि.३० रोजी रात्रौ ७.३० वाजता सुश्राव्य कीर्तन, यजमान श्री दत्ताराम लाड कुटुंबीय, मंगळवार दिनांक १ ऑक्टोंबर रोजी रात्री ७.३० वाजता सुश्राव्य कीर्तन, यजमान श्री अभिजीत तेली कुटुंबीय, बुधवार २ ऑक्टोंबर रोजी रात्री ७.३० वा. कीर्तन, यजमान श्री भिसे व मिशाळ कुटुंबीय, गुरुवार दि. ३ ऑक्टोंबर रोजी रात्री ७.३० वा. किर्तन, यजमान श्री उदय व रामकृष्ण महाडेश्वर कुटुंबीय हे आहेत.
शुक्रवार दि. ४ ते ५ ऑक्टोंबर रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली . प्रथम आलेल्या पहिल्या बारा भजन मंडळांना स्पर्धेसाठी निवड केली जाणार असून इच्छुक स्पर्धकांनी नाव नोंद करावी.
रविवार दि.६ ऑक्टोबर रोजी सायं.७ वा. श्री देवी महालक्ष्मीचा वार्षिक गोंधळ व जागरण कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस गोंधळाचा महाप्रसाद देण्यात येणार आहे. यजमान श्री सहदेव राऊळ कुटुंबीय नारूर हे आहेत.सोमवार दि. ७ ऑक्टोंबर रोजी स्थानिकांची सुस्वर भजने होणार आहे. यजमान श्री अरुण शेटगांवकर कुटुंबीय हे आहेत. मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी दसरा-विजयादशमी रोजी रात्री ९ वा. दशावतारी नाटक आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दि. १२ नोव्हेंबर रोजी श्री देवी महालक्ष्मी चा वार्षिक जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री महालक्ष्मी देवस्थान कमिटी नारूर ,गावकरी मंडळी व नारूर ग्रामस्थांनी केले आहे.

17

4