वेंगुर्लेत एम. के. गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रक्तदान शिबीर

2

वेंगुर्ले,ता.२६ : एम. के. गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त एम. के. गावडे प्रबोधिनी व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता वेंगुर्ले होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
एम. के. गावडेंच्या वाढदिवसानिमित्त गेली २५ वर्षे सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. १५ वर्षांपूर्वीच्या काळात रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या रक्ताची गैरसोय होत होती. तेव्हा एम. के. गावडे प्रबोधिनीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबीरातून रक्तपेढीला मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठा केला जात होता. रक्तदान हेच श्रेष्ठ दान याचे भान ठेवून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करावे असे आवाहन एम. के. गावडे प्रबोधिनी व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0

4