Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावंचित आघाडी लढणार जिल्ह्यातील तीनही जागा...

वंचित आघाडी लढणार जिल्ह्यातील तीनही जागा…

अर्जुन सलगर ; राज्य शासनाकडून ओबीसी आरक्षण हिरावून घेतल्याचा आरोप…

कणकवली, ता.26

वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्गातील तीनही जागांवर उमेदवार उभे करणार आहे. या उमेदवारांची यादी लवकरच मुंबईहून जाहीर होईल अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या देखरेख समितीचे प्रमुख अर्जुन सलगर यांनी आज दिली. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार ओबीसींचे आरक्षण संपवू पाहत आहे. नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात स्थानिक स्वराज्य संस्थांंमधील ओबीसींच्या 105 जागा कमी करण्यात आल्या असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद येथील हिंद छात्रालयात झाली. यात अर्जुन सलगर यांनी भूमिका मांडली. यावेळी आघाडीचे सदस्य अतुल बहुले, जिल्हा संघटक श्यामसुंदर वराडकर,महासचिव प्रमोद कासले, अ‍ॅड.सुदीप कांबळे, कातकरी संघटनेचे सुनील पवार, किशोर चौगुले, भावना कदम आदी उपस्थित होते.
श्री.सलगर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्व 288 जागांवर उमेदवार उभे करण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार पहिल्या 22 उमेदवारांची यादी जाहीर झालीय. तर उर्वरित उमेदवारांच्या याद्या 1 ऑक्टोबरपर्यंत जाहीर होतील. सिंधुदुर्गातील तीन जागांसाठी अनेकांनी मुलाखती दिल्या आहेत. यात काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्याचाही समावेश आहे. आम्ही वंचित हा निकष ठेवला असून मुलाखतीला आलेल्या कार्यकर्त्यांमधून सिंधुदुर्गातील तीनही उमेदवारांच्या नावांची लवकरच घोषणा होणार आहे.
ते म्हणाले, सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वच आरक्षण बंद करण्याचे आवाहन आपल्या भाषणात केले होते. त्यानंतर तातडीने राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 105 ओबीसींच्या जागा रद्द करण्यात आल्या आहेत. ओबीसी आरक्षणाची तरतूद 340 कलमामध्ये आहे. मात्र या कलमाला संवैधानिक मान्यता नसल्याने राज्यशासन ओबीसींचे आरक्षण आपल्या मर्जीनुसार कमी करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments