Wednesday, July 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याखाचकुली, शतावरी सारख्या आयुर्वेदिक वनस्पती रोजगारासाठी करा.....

खाचकुली, शतावरी सारख्या आयुर्वेदिक वनस्पती रोजगारासाठी करा…..

शुभा राऊळ :कोकणातील महीलांना सक्षम करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील….

सावंतवाडी, ता.२६ :
कोकणाच्या डोंगराळ भागात आयुर्वेदिक वनस्पती मोठ्या प्रमाणात आहे. त्यात खाचकुली,शतावरी, करंजा सारख्या दुर्मिळ वनस्पतींचा समावेश आहे. या वस्तूंना मुंबईसारख्या ठिकाणी घेऊन आल्यास येथील बचत गटांच्या महिलांना निश्चितच रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्यासाठी आवश्यक असलेले मार्केट शिवसेना उपलब्ध करून देईल असा विश्वास मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊत यांनी व्यक्त केला दरम्यान शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून महिलांना बळकटी देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे त्या दृष्टीने प्रथम ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागर सुरू आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले शिवसेनेच्या माध्यमातून आज येथे बॅरिस्टर नाथ पै सभागृहात प्रथम ती या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या हा कार्यक्रम तब्बल अडीच तास उशिरा झाल्यामुळे उपस्थित काही महिलांनी जाणे पसंत केले .यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर,लोकसभा संपर्कप्रमुख स्नेहा माने,सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्ष जानवी सावंत,रत्नागिरी जिल्हा संघटक वेदा फडके,शीतल म्हात्रे,संजना घाडी,ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो,दिपाली सावंत,अपर्णा कोठावळे,श्रुतिका दळवी,रश्मी माळवदे,रूची राऊत,विक्रांत सावंत,सागर नाणोसकर,प्रशांत कोठावळे आदी उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments