जिल्ह्यासाठी ३ कोटी ९२ लाखाचा अल्पसंख्यांक निधी

2

प्रभाकर सावंत : चर्च मंदीर आणी सभास्थळांचा समावेश

कुडाळ,ता.२६ : राज्य शासनाने राज्यातील अल्पसंख्याक बांधवांसाठी सन १९ -२० च्या अर्थसंकल्पात ५१ कोटी रूपयाची तरतुद केली आहे. त्यापैकी ३ कोटी ९२ लाख रूपये सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झाले असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी दिली.
कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. सावंत बोलत होते. यावेळी श्री. सावंत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झालेल्या निधी पैकी १ कोटी ५० लाख रू. कुडाळ तालुका, १ कोटी सावंतवाडी तालुका व उर्वरित निधी अन्य तालुक्यांसाठी मंजुर झाला आहे. या निधीसाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी प्रयत्न केले. अल्पसंख्याक विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रथमच अल्पसंख्याक बांधवांसाठी भरीव निधी प्राप्त झाला. या निधीतुन चर्च, मज्जिद सभागृह आदी स्थळांचा विकास केला जाणार आहे. जैन समाजाच्या भोजनालय व समाज मंडपाकरीता ५० लाख रू. यामध्ये मंजुर आहेत. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष चारूदत्त देसाई, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा संयोजक लॉरेन्स मान्येकर , देवेंद्र सामंत, निलेश तेंडुलकर, गजानन वेंगुर्लेकर गुरू देसाई बंड्या सावंत विजय कांबळी, इम्रान खुल्ली, मुस्ताक शेख, आलेक्स रॉड्रीक्स आदी उपस्थित होते.
कुडाळ पत्रकार परिषदेत बोलताना प्रभाकर सावंत चारू देसाई निलेश तेंडोलकर लॉरेन्स मानेकर गजानन वेंगुर्लेकर

13

4