इन्सुली घाटीत रस्त्यावर साचला तब्बल एक फूट “चिखल”…

2

सुरेश सावंत यांची माहीती:खबरदार घेण्याचे वाहनचालकांना आवाहन….

बांदा ता.२६:

मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे येथील इन्सुली घाटीत तब्बल एक फूट चिखल रस्त्यावर आला आहे.परिणामी हातातून गाडी घेऊन जावे लागत आहे.तर याठिकाणी दुचाकीस्वारांचा अपघात होण्याची भीती आहे.येथील मुख्य वळणाच्या खाली असलेल्या धाब्याच्या समोर ही परिस्थिती निर्माण झाली आहे.याबाबतची माहिती सावंतवाडीतील लाकूड व्यवसायिक सुरेश सावंत यांनी दिली.
या ठिकाणावरून येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकीस्वार वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे.तसेच याबाबत संबंधित विभागाने लक्ष घालून रस्त्यावर आलेला चिखल दूर करावा अशी त्यांनी मागणी केली आहे.इन्सुली भागात आज सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला.त्यामुळे मुख्य वळणा पासून काही मीटर अंतरावर डोंगरावरील माती रस्त्यावरून येवून हा चिखल साचला आहे.

0

4