कोकिसरे तील मंगळसूत्र चोरीप्रकरणी संशयित ताब्यात…

2

29 पर्यंत पोलीस कोठडी:मिटर रिडींगच्या बहाण्याने घुसला होता घरात….

वैभववाडी,ता.२६:

कोकिसरे बांधवाडी येथे मीटर रिडिंग घेण्याच्या बहाण्याने घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पोबारा करणारा संशयित आरोपी उत्तम राजाराम बारड वय २७ वर्षे रा. धामोड. ता. राधानगरी, जि. कोल्हापूर याला कोल्हापूर पोलिसांकडून वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला कणकवली न्यायालयात हजर केले असता २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सदर आरोपी हा सराईत असून त्याच्यावर कोल्हापूर जिल्ह्यात ५० ते ५५ गुन्हे दाखल आहेत. तालुक्यातील अन्य गुन्ह्यात सहभाग आहे का? याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत.
कोकिसरे बांधवाडी येथे १६ एप्रिल २०१९ रोजी वीज मिटर रिंडींग घेण्याच्या बहाण्याने घरात घुसला. येथील आनंदीबाई दत्ताराम नारकर वय ७५ या वृध्द महिलेच्या गळ्यातील अडीज तोळ्याचे मंगळसूञ व माळ असा सुमारे ९० हजार रुपयाचे दागीने घेऊन पोबारा केला होता. याबाबत वैभववाडी पोलिसांत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरुन कुडाळ येथील चिञकार रजनीकांत कदम यांनी संशयीत चोरट्याचे रेखाचिञ तयार केले होते.सदर रेखाचिञ कोल्हापूर,रत्नागिरी , बेळगाव येथे पाठविण्यात आले होते.वैभववाडी पोलिस त्याचा शोध घेत होते.अशा प्रकारेच शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी करतांना चोरटा पोलिसांनी पकडला आहे.अशी माहीती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ताञय बाकारे, व स्थानिक गुन्हा अन्वेशनला मिळाली.आरोपी उत्तम बारड याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पहाता वैभववाडी पोलिस ठाणे हद्दीत घडलेला गुन्हा आहे.व आरोपीची गुन्हे करण्याची पध्दत आहे.यावरुन सदर आरोपी हा वैभववाडी कोकिसरे येथे घडलेल्या गुन्ह्यात असण्याची शक्यता आहे.त्यामुळे दि.२५ सप्टेंबर रोजी वैभववाडी पोलिसांनी कोल्हापूर येथे जाऊन न्यायालयाच्या आदेशाने त्याला वैभववाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.सदर आरोपी हा सराईत असून त्याच्यावर त्याच्यावर कोल्हापूर जिल्ह्यात ५० ते ५५ गुन्हे दाखल आहेत.त्याच्याकडे अधिक तपास करुन तालुक्यातील अन्य गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे का ? याबाबत चौकशी करीत आहेत.
लोरे येथेही अशीच घटना घडली होती.टी.स्टाॕल चालविणा-या महिलेच्या गळ्यातील मंगळसूञ खेचून अज्ञात चोरट्याञाने पोबारा केला होता. याबाबत अधिक तपास पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलिस अधिक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॕ नितीन कटेकर, यांच्या मार्गदर्शनाखालीशा सपोनि बाकारे करीत आहेत.

4

4