निवडणूकीसाठी सिंधदुर्गात दोन निवडणूक निरीक्षक…
सिंधुदुर्गनगरी, ता. २६ : विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याकरीता अभिजीत मिश्रा आणि राजेंद्र किशन या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवडणूक निरीक्षक निवडणूक आयोगाने नेमणूक केली आहे .
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून २१ ऑक्टोबला मतदान व २४ ऑक्टोबला मतमोजणी होणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे .
अभिजीत मिश्रा हे ओरिसा राज्यातून येत असून त्याची निवडणूक खर्च निरीक्षक आणि राजेंद्र किशन हे जयपूर राज्यातून येत असून ते जनरल निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली .