निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याकडून मतदान जनजागृती…

2

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याकडून मतदान जनजागृती…

मालवण, ता. २६ : मतदार राजा जागा हो… मतदान करण्यास सज्ज हो… असे मतदान जनजागृतीचे संदेश फलक हाती घेत येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांनी जनजागृती केली.
२१ ऑक्टोबर रोजी होणार्‍या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का अधिक वाढवण्यासाठी तसेच प्रत्येकाने मतदान करा, हा संदेश देत शहर व तालुक्यात जनजागृती फेर्‍या काढण्यात आल्या. येथील तहसीलदार तथा मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ सहायक निवडणूक अधिकारी अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती केली जात आहे. तालुक्यात काढण्यात आलेल्या जनजागृती फेरीत विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.

2

4