हो आमचं ही ठरलंय…

2

हो आमचं ही ठरलंय…

सावंतवाडी मतदारसंघात भाजपचाच उमेदवार हवा, अन्यथा राजीनामा ; रेडी जि. प. मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा निर्धार…

वेंगुर्ले, ता. २७ : भाजप-सेना युती होवो अगर न होवो, युती झालीच तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार हवा, शिवसेना या मित्र पक्षाचा उमेदवार देऊन त्याचा प्रचार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे दडपण आम्हा भाजपा कार्यकर्त्यांवर आणू नये. तसे केल्यास आम्ही रेडी जि. प. मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पदाचा राजीनामा भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांजकडे देऊ आणि त्याची सुरुवात मी वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन करीन अशा भावना व्यक्त करून आम्ही केवळ राजन तेली यांचाच प्रचार रेडी जि. प. विभागीय पदाधिकारी व कार्यकर्ते करणार आहेत. आमचं ही ठरलंय…
असे मत मनोज उगवेकर यांनी सर्वांच्या वतीने व्यक्त केले.
आरवली येथे झालेल्या भाजपा वेंगुर्ला तालुका अंतर्गत रेडी जि. प. विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात भाजपा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजन तेली यांना समर्थन देताना ते बोलत होते. त्यांच्या या निर्णयावर उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हात वर करून यावेळी समर्थन दिले. तसेच सावंतवाडी मतदार संघातून राजन तेली यांना भरघोस मताधिक्याने निवडून आणू, असा निर्धार झालेल्या या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला.

1

4