सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते १५ ऑक्टोंबर या कालावधीत आयोजन…
सावंतवाडी ता.२७: जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ जिल्हा सेवा समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्य़ात १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात १ ऑक्टोबर — केळकर महाविद्यालय देवगड, ४ऑक्टोबर -ग्रामीण रुग्णालय कणकवली,
४ ऑक्टोबर -प्राथमिक आरोग्य केंद्र. परूळे,६ ऑक्टोबर –ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग,६ ऑक्टोबर -प्राथमिक आरोग्य केंद्र निरवडे
११ ऑक्टोबर -ग्रामीण रुग्णालय मालवण,१२ ऑक्टोबर -प्राथमिक आरोग्य केंद्र ईळये,१२ ऑक्टोबर -उपजिल्हा रुग्णालय शिरोडा,१३ ऑक्टोबर -सांस्कृतिक सभागृह इन्सूली कोनवाडा,१४ ऑक्टोबर -प्राथमिक आरोग्य केंद्र पणदुर आदींचा समावेश आहे.
ज्या लोकांना ह्या सामाजिक कार्यात सहभागी व्हायचे असेल त्यानी आपल्या परिसरातील रक्तदान शिबीर केंद्रात येऊन रक्तदान करावे असे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे