सावंतवाडीचे नगराध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला मुंबईत…

2

विधानसभेच्या तिकीटासाठी गेल्याची चर्चा; काही वेळातच होणार चित्र स्पष्ट…

सावंतवाडी ता.२७: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर आज मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. काही वेळात त्यांची भेट होण्याची शक्यता आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी श्री.साळगावकर हे इच्छुक आहेत.राष्ट्रवादीतून आपल्याला संधी दिल्यास आपण निश्चितच रिंगणात उतरू,असा त्यांनी दावा केला होता.दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री.साळगावकर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते.
ते निवडणूक रिंगणात उतरतील का ?त्यांना तिकीट मिळेल का ? असे प्रश्न असतानाच श्री.साळगावकर हे आज मुंबईत दाखल झाले आहेत.आता त्यांची काही वेळातच भेट होणार आहे.त्यामुळे त्यांच्या तिकीटा बाबत नेमके काय ठरते ? श्री.पवार त्यांना नेमके कोणते आश्वासन देतात ?त्यांना विधानसभेचे तिकीट दिले जाईल का ? हे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

0

4