साळगावकरांना राष्ट्रवादीकडुन विधानसभेसाठी हिरवा कंदील…?

2

अखेर पवारांची भेट झाली:सावंतवाडीत येऊन भूमिका स्पष्ट करणार,नगराध्यक्ष 

मुंबई ,ता.२७
सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद यांची अखेर भेट झाली. यावेळी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका बाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे वृत्त आहे.त्यामुळे आता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतून साळगावकरांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा आहे.
या भेटीत झालेल्या चर्चेत नेमके काय स्थित्यंतरे रंगली हे कळू शकले नाही. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत उपस्थित होते.याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.सावंतवाडीत आल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले

0

4