जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत जनता विद्यालय तळवडे संघाचे यश…..

2

 सावंतवाडी, ता.२७ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणेमार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात श्री जनता विद्यालय तळवडेचा संघ उपविजेता ठरला.
अपूर्वा दळवी हिच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या संघाने सावंतवाडी तालुक्याचे विजेतेपद पटकावले होते. कुडाळ हायस्कूल कुडाळच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यात वेंगुर्ला संघावर मात केली. उपांत्य सामन्यात वैभववाडी संघाला पराभूत करत तळवडे हायस्कूलच्या मुलींनी अंतिम फेरी गाठली. साक्षी मेस्त्री या खेळाडूने चमकदार खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांची वाहवा मिळवली. या खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक दयानंद बांगर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाचालक , प्रभारी मुख्याध्यापक प्रसाद आडेलकर, पर्यवेक्षक अशोक पवार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

0

4