कास येथील वाघबिळेश्वर मंदिरात चोरी

2

बांदा,ता.२७ : कास-शेर्ले सीमेवरील श्री देव वाघबिळेश्वर मंदिरातील फंडपेटी अज्ञात चोरट्याने फोडून रोकड लंपास केली. मंदिराचा मुख्य दरवाजाची कडी कापून चोरट्याने आत प्रवेश केला. फंडपेटी मंदिरापासून सुमारे ५०० मीटरवर नेऊन फोडली. आज सकाळी शेर्ले-पानोसेवाडी येथील गुराखी प्रकाश मधुकर राऊळ यांना झुडूपामध्ये फंडपेटी निदर्शनास आली. त्यांनी स्थानिकांना माहिती देताच अनिल भाईप, अजय भाईप, नाना भाईप, अंकुश भाईप, संजय भाईप यांनी मंदिरात जाऊन खात्री केली असता फंडपेटी फोडल्याचे निदर्शनास आले. फंडपेटीत ५ ते ६ हजार रुपये रक्कम असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

0

4