राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा शिवसेनेवर पलटवार….

2

तुम्ही आमचे दोन नगरसेवक घेतले आम्ही तुमचा नगराध्यक्ष घेतला….

कुडाळ ता.२७:

तुम्ही राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक घेतले आम्ही सावंतवाडीतील तुमचा नगराध्यक्षच घेतला,असे सांगून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी शिवसेनेला पलटवार दिला आहे.चार दिवसापूर्वी शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण येथील राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक दर्शना काटवकर,शिला गिरकर या दोघांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
या नंतर मालवण दौर्‍यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला श्री.सामंत यांनी आठ दिवसात उत्तर देऊ असे सूचक वक्तव्य केले होते.आज नगराध्यक्ष साळगावकर व पवार यांची भेट झाल्यानंतर श्री.सामंत यांनी ब्रेकिंग मालवणीला आपली प्रतिक्रिया दिली.यात तुम्ही नगरसेवकांच्या रुपाने दोन घेतले,मात्र आम्ही थेट नगराध्यक्षच घेतला.असे सांगून त्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.

0

4