प्रकृती अत्यवस्थ: सभा सुरू असतानाच छातीत लागले दुखू….
सिंधुदुर्गनगरी,ता.२७:
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दीपक चव्हाण यांची गुरुवारी सभेला बसले असताना अचानक तब्बेत बिघडली. त्यांच्या छातीत दुखु लागले. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अजूनही ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली आहे. आता ते व्यवस्थित असल्याचे सांगण्यात येते.
गुरुवारी दुपारी वित्त समिती सभा सुरु होती. या सभेला प्रकल्प संचालक चव्हाण आले होते. सभा सुरु असतानाच त्यांच्या छातीत दुखु लागले. त्यामुळे ते सभाध्यक्ष जेरॉन फर्नांडिस यांची परवानगी घेत सभागृहाबाहेर पडले. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर योग्य उपचार सुरु असून आता त्यांची तब्बेत ठीक आहे.