पाणी व स्वच्छ्ता विभागाला नविन अधिकारी…

2

प्रकाश जोंधळे यांनी स्वीकारला पदभार….

सिंधुदुर्गनगरी,ता.२७:

जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छ्ता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चव्हाण यांची पदोन्नतीने सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक या पदावर बदली झाली असून त्यांच्या जाग्यावर प्रकाश जोंधळे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. जोंधळे यांनी आपल्या पदभार स्वीकारला आहे. जोंधळे हे यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील फलंबुरी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून चार वर्षे कार्यरत होते. त्यानंतर शासनाने त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली केली आहे. जोंधळे हे मुळ नांदेड जिल्ह्यातील असून याच जिल्ह्यात त्यांची अनेकवर्षे सेवा झाली आहे.

5

4