वेंगुर्लेतील एम.के.गावडे यांचा २९ सप्टेंबर ला वाढदिवस…

2

साध्या पद्धतीने होणार साजरा;पुरपरिस्थिती,शेतकऱ्यांवरील संकटामुळे निर्णय…

वेंगुर्ले ता.२७:

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जेष्ठ नेते, कृषीभुषण तथा जिल्हा दुध संघांचे अध्यक्ष एम.के.गावडे यांचा २९ सप्टेंबर रोजी वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा केला जातो. परंतु यावर्षी अतिवृष्टी मुळे आलेली पुरपरिस्थिती, शेतकरी वर्गाचे झालेले नुकसान, वाढत्या महागाईच्या भस्मासूरामुळे सर्व सामान्य जनता होरपळून जात आहे. या सर्व बाबींचा विचार करून दिनांक २९ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी १०.३० वा. एम.के.गावडे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने वेतोरे येथील निवासस्थानी साजरा होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्र परिवार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.

0

4