इडीच्या चौकशीसाठी जाणार नाही….

2

शरद पवार:कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने निर्णय….

मुंबई ता.२७:

कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपण चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाणार नाही,असा खुलासा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.ईडीच्या चौकशी संदर्भात श्री.पवार आज ईडी कार्यालयात जाणार असल्याचे वृत्त होते.दरम्यान ईडीकडून त्यांना सद्यस्थितीत चौकशीसाठी येऊ नका,गरज पडल्यास आम्ही दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बोलवू असे पत्र पाठविण्यात आले होते.मात्र तरीसुद्धा आपण चौकशीसाठी जाणार असा पवित्रा श्री.पवार यांनी लावून धरला होता.
या पार्श्वभूमीवर श्री.पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.आपल्याला विधानसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेत कोणतेही बदल करायचे नाही आहेत. त्यामुळे मी आता चौकशीसाठी जाणार नाही मात्र या सर्व प्रकारात पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेसह राहुल गांधी व तळागळातील कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

1

4