वेंगुर्लेत एम. के. गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न…

2

शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १२७ रक्तदात्यांकडून रक्तदान…

वेंगुर्ले ता.२७: एम. के. गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त एम. के. गावडे प्रबोधिनी व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून वाढदिवसानिमित्त राबविलेला हा उपक्रम समाजपयोगी असाच असल्याचे होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे प्रा. डॉ. के.जी.केळकर यांनी सांगितले. या शिबिरात १२७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
वेंगुर्ले होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज येथे या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन डॉ. केळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जनसेवा रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. पी. एम. मोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, तालुका उपाध्यक्ष योगेश कुबल, युवक अध्यक्ष रोहन वराडकर, उपप्राचार्य डॉ.पूजा कर्पे, माजी नगरसेवक वामन कांबळे, श्री नांदगावकर, प्रदीप सावंत, हेमांगी रणदिवे, सुरेश डोंगरे, श्री राणे, श्री. गावकर तसेच पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
श्री. गावडे यांच्या वाढदिवसा निमित्त गेली २५ वर्षे सातत्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. १५ वर्षांपूर्वीच्या काळात रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या रक्ताची गैरसोय होत होती. तेव्हा एम. के. गावडे प्रबोधिनीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबीरातून रक्तपेढीला मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठा केला जात होता. रक्तदान हेच श्रेष्ठ दान याचे भान ठेवून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे प्रज्ञा परब यांनी सांगितले. रक्तदान केलेल्या दक्तदात्याना भेटवस्तू देऊन त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमचे प्रास्ताविक डॉ. लिंगवत यांनी तर आभार धर्माजी बागकर यांनी मानले.

11

4