वेंगुर्लेत शिवसेनेच्या वतीने तालुकास्तरीय वारकरी भजन स्पर्धा

2

नवरात्रउत्सवाच्या निमित्ताने ३ व ४ ऑक्टोबर रोजी आयोजन…

वेंगुर्ले : ता.२७ : वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक नवरात्रउत्सवाच्या निमित्ताने गुरुवार ३ ऑक्टोबर व शुक्रवार ४ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरीय वारकरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेने तर्फे आयोजित या स्पर्धेत विजेत्या भजन संघाला ५००० रुपये व चषक, उपविजेत्या संघाला ३००० रुपये व चषक तर तृतीय क्रमांक संघास २००० रुपये व चषक त्याच प्रमाणे वयक्तिक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. भजनाचा कालावधी ४० मिनिटांचा राहील. भजनामध्ये स्तवन, राम कृष्ण हरी, रूपाचा अभंग, ध्यानाचा अभंग, गजर, अभंग, गोंधळ, गौळण, ज्ञानेश्वर माऊली, मागणीपर अभंग, संतपद, ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा क्रमाने सादरी करण आवश्यक आहे. तरी संघांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी प्रसाद गुरव/ नितिश कुडतरकर ९१६८०५३७१६, ९७३०२२७२७५ किंवा ९१७५०८३०३१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

5

4