ओरोस फाटा शिवस्मारकाची शिवप्रेमीनींच केली स्वच्छ्ता…

2

देखभाल दुरुस्ती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

सिंधुदुर्गनगरी, ता. २७ :  सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीतील ओरोस फाटा येथे असलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या परिसरात झाडी वाढली होती. त्यामुळे शिवस्मारक झाडीनी झाकोळला गेला होता. शुक्रवारी शिवप्रेमींनी एकत्र येत ही झाडी तोडली. तसेच या शिवस्मारकाची देखभाल दुरुस्ती तत्काळ करावी, असे लेखी निवेदन जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांना दिले.
या शिवस्मारक स्वच्छ्ता प्रसंगी दोडामार्ग येथील शिवप्रेमी प्रकाश गवस, मंगेश पाटील, बाबू आईर, विठ्ठल सावंत, सचिन पांढरभिसे, देवेश रेडकर, शेखर आईर, सनिश नाईक, गजानन मुंज, अमेय तुळसकर, वैभव ईनामदार, शैलेश गावडे आदी सहभागी झाले होते.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात, शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे दैवत नसुन हिन्दुस्थानचे दैवत आहेत. त्यांच्याच प्ररणेतून महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. याबाबत प्रेरणा मिळावी म्हणून महाराष्ट्रात जागोजागी शिवस्मारक उभारण्यात आली. त्याच उद्देशाने जिल्ह्याच्या राजधानीत हे स्मारक उभारले आहे. परंतु दुर्दैवाने प्रशासन याची देखभाल करीत नाही. या पावसाळ्यात स्मारक परिसरात झाडी मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना ती तोडण्यात आली नाही हे दुर्दैवआहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सिंधुदुर्ग भूमी असून त्यांनी उभारलेले किल्ले हे त्यांच्या पराक्रमाची साक्ष आहेत. तरीही त्यांच्या स्मारकाची होत असलेली दुरवस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषणावह नाही. त्यामुळे शिवप्रेमी म्हणून या स्मारकाची देखभाल दुरुस्ती करावी, असे नमूद करण्यात आले आहे.

2

4