पत्नीच्या खून प्रकरणी पती अमित याला एक दिवसाची पोलिस कोठडी…

186
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आचरा, ता. २७ :

चिंदर सडेवाडी येथे काल दुपारी पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी पती अमित दत्तात्रय मुळे याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
पती पत्नीचा वाद विकोपास जाऊन पती अमित मुळे याने पत्नी अनुराधा हिचा गळा दाबून खून केल्याची घटना काल चिंदर सडेवाडी येथे उघडकीस आली होती. याबाबत संशयित आरोपी अमित याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार आचरा पोलिसांनी त्याला आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रातून ताब्यात घेतले होते.
चारीत्र्याच्या संशयावरून अमित बहिणीशी वाद घालत असल्याची फिर्याद मयतचा भाऊ लक्ष्मण घाडीगांवकर याने काल आचरा पोलिस ठाण्यात दिली होती. याबाबत संशयित आरोपी अमित याला आज दुपारी मालवण न्यायालयासमोर हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. उद्या त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

\