Thursday, November 7, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी विधानसभेसाठी पहिल्याच दिवशी घेतले तिघांनी अर्ज...

सावंतवाडी विधानसभेसाठी पहिल्याच दिवशी घेतले तिघांनी अर्ज…

सावंतवाडी,ता.२७:
येथील विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आज कोणीही नामनिर्देशनपत्र दाखल केलेले नाही.मात्र तिघांनी नामनिर्देशन पत्राचा फॉर्म घेतला आहे. विरजा वासुदेव कदम, जयराम बांदवलकर आणि मोतीराम चंद्रकांत नेवगी आदींचा समावेश आहे.याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.
आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयातून विरजा वासुदेव कदम, जयराम बांदवलकर आणि मोतीराम चंद्रकांत नेवगी या तिघांनी नामनिर्देशनपत्राचे फॉर्म नेले असल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आले.
दरम्यान पितृपक्ष सुरू असल्याने विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र पितृपक्षानंतर भरली जातील असे सांगण्यात येत आहे .

शिवसेनेतून पालकमंत्री दीपक केसरकर ,भाजपातून माजी आमदार राजन तेली , राष्ट्रवादी काँग्रेस मधुन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे उमेदवार पित्रू पक्षा नंतरच नामनिर्देशनपत्र दाखल करतील असे बोलले जात आहे .

सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर,सहाय्यक निवडणूक अधिकारी सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे व वेंगुर्ले तहसीलदार प्रविण लोकरे आज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये निवडणुकीबाबत चे नियोजन केले.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले येत्या रविवारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments